
अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याच्या 'OMG2' या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या या सिनेमातील वेशभूषेमुळे त्याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आज 'OMG 2' चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे. हा सिनेमा २०१२ साली आलेल्या 'OMG' या सिनेमाचा सिक्वेल आहे. अक्षय कुमार हा 'OMG2' या सिनेमात भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार असून त्याचा हा लूक चांगलाच व्हायरल झाला आहे. 'OMG' मध्ये तो भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. 'OMG' हा सिनेमा करत असताना अक्षयने त्याच्या जीवनशैलीत बरेजसे बदल केले होते. अक्षयने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.
बॉलिवूडचा खिलाडी असलेल्या अक्षने आपल्या आईला सिनेसृष्टीपासून नेहमीच लांब ठेवले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार अक्षय कुमार 'OMG' चित्रपटात काम करत असताना त्याच्या आईने त्याला मांसाहार सोडण्याचा सल्ला दिला होता. अक्षय कुमारची आई कृष्णाची भक्त होती. त्यांचा अशा विश्वास की त्याच्या मुलाने देखील शुद्ध सात्विक आहाराचं सेवन करावं तसंच सर्व नियमांच पालन करावं. अक्षय 'OMG' मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारत असल्याचं त्याने त्यांच्या आईला सांगितल्यावर त्यांना आनंद झाला. तेव्हा अक्षय कुमारच्या आईने त्याला फक्त शाकाहारी जेवनाची विनंती केली. अक्षयनेते देखील त्याच्या आईचं म्हणणं लगेच मान्य केलं.
आता त्याचा 0 'OMG 2' या बहुचर्चित सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार याच्यासह पंकज त्रिपाठी, परेश रावल आणि यामी गौतम असे कसलेले कलाकार दिसणार आहेत. ११ ऑगस्ट रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. बहुचर्चित 'गदर २' हा सिनेमा देखील त्याच दिवशी प्रकाशित होणार आहे.