
बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खाने याने तब्बल चार वर्षांनी आपल्या 'पठाण' या ब्लॉकबस्टर सिनेमाने कमबॅक केलं. आता त्याच्या 'जवान' या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलीज करण्यात याला. याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. यात प्रिव्ह्यूमध्ये बरेच अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत.
'जवान' चित्रपटात शाहरुखच्या जोडीला तगडी साऊथ सुपरस्टार्सची तकडी स्टारकास्ट असणार आहे. यात त्याच्याबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'जवान' सिनेमा कमाईच्या बाबतीत 'पठाण' या सिनेमालाही मागे टाकेल असं सांगितलं जात आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करेल असं मत ट्रेड एक्सपर्टचं मत आहे.
प्रसिद्ध अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान याने ट्विट करत म्हटलं आहे की, "जवान हा सिनेमा पाहण्यासाठी ७९ % लोक उत्सुक आहेत. याचा अर्थ हा सिनेमा पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई भारतात तर १२५ कोटींची कमाई जगभरात करु शकतो." यानंतर आणखी एक ट्विट करत तो म्हणाला की, "जर शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाने पहिल्याचं दिवशी ७५ कोटींची कमाई केली तर अजय देवगण, आमिर खान, अक्षय कुमार, हृतिक यांनी पुढच्या आठवड्याभर तरी झोप येणार नाही."
अॅटली हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नव्या दमाच्या यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याने 'जवान' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून यासाठी अॅटली याने प्रचंड मेहनत घेतली आहे. गौरी खानने 'जवान' या सिनेमाची निर्मीती केली असून गौरव वर्मा या सिनेमाचा सहनिर्माता आहे.