'ऑस्कर'मध्ये भारताचा दणका! 'दि एलिफंट व्हिस्पर' आणि 'नाटू नाटू' ला मिळाला पुरस्कार

'ऑस्कर'मध्ये भारताचा दणका! 'दि एलिफंट व्हिस्पर' आणि 'नाटू नाटू' ला मिळाला पुरस्कार

भारताने पुन्हा एकदा ऑस्कर सोहळ्यात इतिहास रचला असून यावेळी भारतीयांची धूम पाहायला मिळाली

आज ऑस्कर २०२३ हा भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरला. कारण बहुचर्चित चित्रपट 'आरआरआर'मधील 'नाटू नाटू' बेस्ट ओरिजनल सॉंगचा ऑस्कर मिळाला. तर, 'द एलिफेंट व्हिस्पर' या शॉर्ट फिल्मने बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला.

जगभरात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑस्करमध्ये मिळालेल्या या २ पुरस्कारांमुळे भारतीयांची मान उंचावली आहे.

विशेष म्हणजे भारतीय अभिनेत्री दीपिका पदूकोण प्रेझेंटर म्हणून स्टेजवर आली, तिने तिच्या भाषणात 'नाटू नाटू' गाण्याचा उल्लेख केला.

त्यानंतर स्टेजवर 'नाटू नाटू' या गाण्याचे मूळ गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरवा यांनी हे गाणे लाईव्ह गायले.

तर, या गाण्यावर हॉलीवूडच्या कलाकारांनी डान्स परफॉर्मन्स केला. हा परफॉर्मन्स संपल्यानंतर सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात गाण्याचे कौतूक केले. ऑस्करमधील हा सर्वात ऐतिहासिक क्षण ठरला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in