Oscars 2023 : ऑस्करमध्ये 'आरआरआर'ची हवा ; नाटू नाटू गाण्याला ऑस्कर नामांकन

अवतारचे निर्माते जेम्स कॅमेरून यांनाही हा चित्रपट आवडला, त्यांनी राजामौली यांचे कौतुक केले होते
Oscars 2023 : ऑस्करमध्ये 'आरआरआर'ची हवा ; नाटू नाटू गाण्याला ऑस्कर नामांकन

एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट अजूनही चर्चेत आहे. या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर नामांकन 2023 मधील मूळ गाण्यांच्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट स्कोअर अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. राम चरण आणि जूनियर एनटीआर यांनी RRR चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. यातील नाटू नाटू हे गाणे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या गाण्याची जादू अजूनही कायम आहे. या गाण्यावर अनेकजण थिरकले. आता या गाण्याला मूळ गाण्यांच्या श्रेणीत ऑस्कर नामांकन मिळाले आहे.

SS राजामौलीचा RRR 24 मार्च 2022 रोजी पडद्यावर आला. SS राजामौली यांच्या चित्रपटात Jr NTR, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. हा चित्रपट भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळाला. या गाण्यांनी सर्वांची मने जिंकली. अवतारचे निर्माते जेम्स कॅमेरून यांनाही हा चित्रपट आवडला, त्यांनी राजामौली यांचे कौतुक केले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in