पद्मभूषण पुरस्कार विजेत्या गायिका वाणी जयराम यांचे वयाच्या 77 वर्षी निधन

वाणी जयराम यांना याच वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
पद्मभूषण पुरस्कार विजेत्या गायिका वाणी जयराम यांचे वयाच्या 77 वर्षी निधन
Published on

संगीत जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पद्मभूषण पुरस्कार विजेत्या गायिका वाणी जयराम यांचे वयाच्या 77 वर्षी निधन झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाणी चेन्नईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या. याबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही.


वाणी जयराम यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत कोणतीही माहिती नाही. वाणी जयराम यांना याच वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वाणी यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून, यामुळे संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
10 हजारांहून अधिक गाण्यांना आवाज देणाऱ्या जयराम यांनी नुकतीच व्यावसायिक गायक म्हणून संगीत क्षेत्रात 50 वर्षे पूर्ण केली आहेत. वाणी यांनी आपल्या कारकिर्दीत 10,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. वाणी जयराम यांनी आरडी बर्मन, केव्ही महादेवन, ओपी नय्यर आणि मदन मोहन यांच्यासह अनेक प्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केले.

logo
marathi.freepressjournal.in