सेटवर सलमान खानने मुलींसाठी ठेवला होता 'असा' नियम; श्वेता तिवारीच्या मुलीने केला खुलासा

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा 'किसी का भाई, किसी की जान' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी यामधून पदार्पण करत आहे
सेटवर सलमान खानने मुलींसाठी ठेवला होता 'असा' नियम; श्वेता तिवारीच्या मुलीने केला खुलासा

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याचा बहुचर्चित चित्रपट 'किसी का भाई, किसी की जान' हा लवकरच प्रदर्शित होत आहे. नुकतेच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सलमान खानने यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे यामध्ये अनेक नवीन चेहरे पाहायला मिळणार असून छोट्या पडद्यावरची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यावेळी तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने भाईजान सलमान खानसोबतच अनुभव सांगितला.

नवोदित अभिनेत्री पलक तिवारी मुलाखतीमध्ये म्हणाली की, "सलमान खान हा पारंपरिक अभिनेता असून सेटवर त्यांनी मुलींसाठी एक नियम ठेवला होता. मुलींनी व्यवस्थित कपडे घालावे, असा त्यांचा नियम होता. ते सांगायचे की, माझ्या सेटवर कोणतीही मुलगी नेकलाइनच्या खाली कपडे घालणार नाही. सर्व मुलींनी चांगल्या मुलींप्रमाणे अंगभर कपडे घातले पाहिजेत. मुलींनी सुरक्षित राहावे हा त्यामागचा त्यांचा हेतू होता. कारण, सेटवर अनेक अनोळखी पुरुष वावरत असतात, त्यामुळे प्रत्येकावर पूर्ण विश्वास टाकणे त्यांचा जमत नाही. त्यामुळे प्रत्येक मुलीच्या सुरक्षेसाठी त्यांनी हा नियम बनवला आहे." असा खुलासा तिने केला.

पलक तिवारी ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. तिने पदार्पण करण्याआधी सलमान खानच्या 'अंतिम - द फायनल ट्रुथ' या चित्रपटामध्ये सहाय्यक म्हणून काम केले होते. सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान’मध्ये पूजा हेगडे, शेहनाज गिल, पलक तिवारी, दाक्षिणात्य स्टार जगपती बाबू, वेंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल अशा मोठ्या कलाकारांचा भरणा आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in