परिणिती चोप्रा -राघव चड्ढा यांचा साखरपुडा थाटात संपन्न

राघव चड्ढा यांचं ट्विट व्हायरल
परिणिती चोप्रा -राघव चड्ढा यांचा साखरपुडा थाटात संपन्न

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा या दोघांचा साखरपुडा शाही अंदाजात पार पडला. यावेळी त्या दोघांनी पेस्टल रंगाचे कपडे परिधान केले होते. या दोघांचेही साखरपुड्याचे फोटो अखेर समोर आले आहेत.

आप खासदार राघव चड्ढा यांनी ट्विट करून फोटो शेअर केले . जिचं स्वप्नं पाहिलं ते पुरं झालं , असंही त्यांनी लिहिलंय.

राघव चड्ढा यांचं ट्विट सध्या व्हायरल होत आहे. शाही लुकमध्ये परिणीती-राघव शोभून दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in