परिणीती चोप्रा-राघव चड्ढाचा आज साखरपुडा, कशी असेल थीम ?

सोहळ्यात सिनेविश्वातील आणि राजकारणातील अनेक मंडळी होतील सहभागी
परिणीती चोप्रा-राघव चड्ढाचा आज साखरपुडा, कशी असेल थीम ?

अखेर तो दिवस आला. गेले काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा हो जोडी चर्चेत होती. आज या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे.या शाही साखरपुड्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

परिणीती आणि राघव यांच्या शाही साखरपुड्याची थीम काहीशी वेगळी आहे . परिणीती-राघव यांच्या साखरपुड्याला येणाऱ्या मंडळींसाठी पेस्टल रंगाची थीम ठरवण्यात आली आहे.

परिणीती प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केलेला लेहेंगा घालणार आहे. राघव यांचा आऊटफिट फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केला आहे. दोघांचाही लुक शाही असेल अशी चर्चा आहे.

या सोहळ्यात सिनेविश्वातील आणि राजकारणातील अनेक मंडळी सहभागी होणार आहेत. लंडनहून परिणीतीची चुलत बहीण अभिनेत्री प्रियांका चोप्राही दिल्लीत पोहोचली आहे.

logo
marathi.freepressjournal.in