Pathaan Controversy : 'पठाण'चे पोस्टर फाडले, मॉलची केली तोडफोड; गुजरातमध्ये बजरंग दल आक्रमक

जानेवारी महिन्यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा 'पठाण' प्रदर्शित होणार असून या चित्रपटावरून हंगाम सुरूच असल्याचे चित्र
Pathaan Controversy : 'पठाण'चे पोस्टर फाडले, मॉलची केली तोडफोड; गुजरातमध्ये बजरंग दल आक्रमक
@Bajrangdal_Guj
Published on

'पठाण' हा बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा चित्रपट २५ जानेवारीला संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे. पहिल्या गाण्यापासून सुरु झालेला वाद या चित्रपटाची पाठ सोडत नाही आहे. देशभर अनेक ठिकाणी या चित्रपटाला बॅन करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, गुजरातमध्ये बजरंग दलने पठाण चित्रपटाचा विरोध करत मॉलची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी या चित्रपटाचे पोस्टरदेखील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आले.

पठाणच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी बुधवारी बजरंद दल आणि विश्व हिंदु परिषदच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादमधल्या वस्त्रपूर मॉलमध्ये तोडफोड केली. यावेळी शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचे पोस्टरदेखील फाडण्यात आले. बजरंग दलाच्या ट्विटरवरून यासंदर्भातले व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. चित्रपट प्रदर्शित होण्याचा तोंडावर असताना हा वाद संपण्याचे नाव घेत नाही आहे. संतप्त कार्यकर्ते हे शाहरुखविरोधात घोषणाबाजी करत आहेत. यावेळी त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारादेखील दिला आहे. यावेळी बजरंग दलाचे अध्यक्ष ज्वलित मेहता म्हणाले की, "दीपिका पदुकोणने या चित्रपटामध्ये केलेल्या वेशभूषेचा आम्ही निषेध करतो आहोत. 'पठाण' हा चित्रपट लव्ह-जिहादला प्रेरणा देणारा असून आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही" असा इशारा त्यांनी दिला आहे.

वाद नेमका कशामुळे सुरु झाला?

'पठाण' या चित्रपटामधील 'बेशरम रंग' हे गाणे १२ डिसेंबरला प्रदर्शित झाले. यामध्ये शाहरुख खान सोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण बोल्ड डान्स करताना दिसत आहेत. खरा वाद सुरु झाला तो तिने या गाण्यादरम्यान परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीवरून. भगव्या रंगाची बिकनी परिधान करून बोल्ड दृश्य देत हिंदू धर्माचा अपमान केला असल्याची भावना अनेक हिंदू संघटनांनी केला. यानंतर या चित्रपटाविरोधात भाजपसह अनेक हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित होतो का नाही? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

logo
marathi.freepressjournal.in