Pathaan : 'पठाण'मधला 'तो' सिन लीक; शाहरुख-सलमान दिसले एकत्र

बहुचर्चित पठाण (Pathaan) चित्रपट देशभर प्रदर्शित झाला असून यामध्ये शाहरुख खान आणि सलमान खान एकत्र दिसणार असल्याची चर्चा
Pathaan : 'पठाण'मधला 'तो' सिन लीक; शाहरुख-सलमान दिसले एकत्र

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा 'पठाण' अखेर देशभर प्रदर्शित झाला आहे. अनेक वादांमध्ये अडकलेल्या या चित्रपटासमोर अनेक चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे. विशेष म्हणजे, विरोध होऊनही या चित्रपटाची क्रेझ किती आहे याची प्रचिती त्याच्या रेकॉर्ड ब्रेक अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरूनच होते. तसेच, यामध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील शाहरुख सोबत दिसणार असल्याची चर्चा होती. अखेर यासंदर्भातला एक सिन लीक झाला असून यामध्ये शाहरुख आणि सलमान दोघेही एकत्र मोठ्या पडद्यावर दिसत आहेत.

लीक झालेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान आणि सलमान खान दोघेही एकत्र दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान या चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार म्हणून असणार आहे, अशी चर्चा होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच, संपूर्ण चित्रपटही ऑनलाईन लीक झाला आहे. आज अवघ्या काही तासांमध्येच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याने, चित्रपटाच्या पायरसीबाबत मोठी शंका उपस्थित करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बक्कळ कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडीत काढणार असल्याचा अंदाज चित्रपट अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in