"जनता मूर्ख नाही.सगळं जाणते...'' अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे ट्वीट व्हायरल

तेजस्विनीनं शेअर केलेल्या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या तर काहींनी तेजस्विनीला ट्रोल केलं आहे.
 "जनता मूर्ख नाही.सगळं जाणते...'' अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे ट्वीट व्हायरल

अभिनेत्री तेजस्विनी पंडित नेहमी तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चर्चेत असते. तेजस्विनी सोशल मीडियावरही नेहमीच अ‍ॅक्टिव्ह दिसते. ती तिच्या क्षेत्राशी निगडीत विषयांवर, सामाजिक विषयांवर तसेच राजकीय विषयांवर आधारित मतं मांडत असते. तेजस्विनीने नुकतेच केलेलं एक ट्वीट व्हायरल होतं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तेजस्विनीनं ट्वीटच्या माध्यमांतुन मांडलेल्या मतावर अनेकांनी कमेंट केल्या तर काहींनी तेजस्विनीला ट्रोल केलं आहे.

काय आहे ट्वीट

तेजस्विनीनं ट्वीटमध्ये लिहिलं, "जनता मूर्ख नाही.सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !" या ट्वीटमध्ये तेजस्विनीनं कोणाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे या ट्वीटच्या माध्यमातून तेजस्विनीनं नेमका कोणाला टोला मारला? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

तेजस्विनीनं शेअर केलेल्या ट्वीटवर एकाने कमेंट करुन "ताईंनी (येत नसलेला) अभिनय सोडून सरळ राजकारणात यावे. उगाच कशाला उंटावरून शेळ्या हाकायच्या?" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "जनता मूर्ख नाही पण मूर्ख बनवलं जातंय..." तर काहींनी मत मांडल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in