
अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत असतात. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमातील दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेटिझन्सने सबाला तिच्या लूकच्या आधारे ट्रोल केले आहे. 'रॉकेट बॉईज 2' या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगला हृतिक आणि सबा उपस्थित होते. या मालिकेत सबाही दिसणार आहे. त्याचप्रमाणे हृतिक आणि सबाचे पडद्यावरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काहींनी तर सबाला कंगनाची 'स्वस्त कॉपी' म्हटले आहे. हा व्हिडिओ विरल भयानी यांनी शेअर केला आहे.
कंगना आणि हृतिक रोशनचा वाद सर्वश्रुत आहे. कंगनाने हृतिकसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता, मात्र हृतिकने हे वृत्त फेटाळून लावले होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या आणि मीडियासमोर आरोप-प्रत्यारोपही केले. तसेच हृतिकची गर्लफ्रेंड ही कंगनाची स्वस्त कॉपी असल्याचे म्हणत नेटिझन्सनी अभिनेत्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.