'फकाट'- धमाकेदार कॉमेडी आणि मित्रांची गोष्ट

'फकाट' चित्रपटाच्या टीमने नवशक्तीच्या ऑफिसला दिली खास भेट
'फकाट'- धमाकेदार कॉमेडी आणि मित्रांची गोष्ट

हेमंत ढोमे आणि सुयोग्य गोऱ्हे हे खऱ्या आयुष्यातले मित्र या चित्रपटदेखील मित्र म्हणून आपल्या समोर येणार आहेत.'फकाट' हा मराठी चित्रपट येत्या १९ मे रोजी प्रदर्शित होत आहे . हा एक धमाल विनोदी चित्रपट आहे. याव्यतिरिक्त अनुजा साठे , रसिका सुनील , अविनाश नारकर, नितीश चव्हाण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला यापूर्वीही मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा एक हटके चित्रपट घेऊन ते आले आहेत.

नुकतंच या चित्रपटाच्या टीमने नवशक्तीच्या ऑफिसला खास भेट दिली. हेमंत ढोमे आणि अनुजा साठे एकमेकांना कॉलेजपासून ओळखत आहेत. त्यांनी याआधी काही प्रोजेक्टमध्ये एकत्र कामदेखील केलंय. 'तुझी माझी जोडी जमली' हे अशोक सराफ-किशोरी शहाणे यांच्यावर चित्रित झालेलं आणि तुफान गाजलेलं गाणं पुन्हा एकदा 'फकाट' या चित्रपटात आपल्याला अनुभवता येणार आहे. हेमंत ढोमे आणि अनुजा साठे यांनी अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांच्या हुबेहूब स्टेप्स यात केल्या आहेत. जुन्या गाण्यांवरील प्रेमापोटीच हे गाणं या चित्रपटात असावं अशी दिग्दर्शकाची इच्छा होती . अशोक सराफ यांनी दोघांचं कौतुक केलं आणि किशोरी शहाणे यांनी सोशल मीडियावर शेअर करत या नव्या गाण्याची दखल घेतली, असं हेमंत ढोमेने सांगितलं .

सुयोग्य गोऱ्हे याने हेमंत ढोमेच्या दिग्दर्शनाखाली सातारचा सलमान या चित्रपटात काम केलं आहे. सध्या हे जिवलग मित्र एकमेकांचे शेजारी असून ते एकाच बिल्डिंग मध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या मैत्रीची भट्टी चित्रपटातही आपल्याला पाहायला मिळेल , असं सुयोग्य गोऱ्हे म्हणाला.

हिंदी सिरीजमध्ये व्यस्त असलेली अनुजा साठे मराठीत काम करायला नेहमीच आतुर असते, फक्त वेळ काढणं थोडं कठीण जातं. 'फकाट' हा चित्रपट लॉकडाऊनपूर्वी चित्रित झाला होता. आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करणारा ठरेलच , याशिवाय यातील कॉमेडी पाहून ते पोट धरून हसतील, असं अनुजा साठे म्हणाली.

'फकाट' हा मराठी चित्रपट येत्या १९ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे .

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in