प्रभासच्या 'सालार'ला ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदा झाला ; 'इतक्या' कोटींचा गल्ला चार दिवसांतच पार केला

आदिपुरूष पाठोपाठ सालारनेही मोठा प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचला आहे. त्याच्या करियरला ‘गियर अप’ करण्याचे काम आता 'सालार'ने केले आहे.
प्रभासच्या 'सालार'ला ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदा झाला ; 'इतक्या' कोटींचा गल्ला चार दिवसांतच पार केला
PM

या वर्षाच्या अखेरीस तीन सुपरहिट बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ज्यामध्ये रणबीरचा 'अॅनिमल', साऊथचा सुपरस्टार प्रभासचा 'सालार' आणि शाहरुख खानचा 'डंकी'. मात्र, या तिन्ही चित्रपटांना प्रभासच्या 'सालार' तगडी टक्कर देत असल्याचे चित्र आहे. चौथ्या दिवशी कमाईच्या बाबतीत सालारने डंकीवर तर मात केली. शिवाय अॅनिमलच्याही अगदी जवळ पोहोचला.

आदिपुरूष प्रदर्शित होण्याआधी बॉक्स ऑफिसवर प्रभासचे सिनेमे खास कामगिरी करू शकले नव्हते. पण, आता आदिपुरूष पाठोपाठ सालारनेही मोठा प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचला आहे. त्याच्या करियरला ‘गियर अप’ करण्याचे काम आता 'सालार'ने केले आहे. नाताळचा आणि विकेंडचा फायदा सालारच्या कमाईला झाल्याचे दिसून येत आहे.

कमाई किती?

'सालार' हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी 90.7 कोटींची दमदार ओपनिंग देत 'सालार'नं अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी तर तिसऱ्या दिवशी 'सालार'ने 62.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता रिलीजच्या चौथ्या दिवशी 'सालार'ने 'Sacknilk' च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 42.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अॅनिमलच्या (43 कोटी) तुलनेत तो थोडाच मागे राहिला. यासह 'सालार'ने बॉक्स ऑफिसवर एकूण 251.60 कोटींचा बक्कळ गल्ला जमवला आहे. तर, जगभरात या चित्रपटाने 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

आता 500 कोटींच्या क्लबमध्ये -

आता लवकरच 'सालार' 500 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचणार, अशी अपेक्षा निर्माते आणि चाहते करत आहेत. 'सालार': सीझ फायर- भाग 1 मध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांची मुख्य भूमिका आहे. या सोबतच चित्रपटात श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू, सरन शक्ती यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in