प्रभासचा 'सालार' बॉक्स ऑफिस गाजवणार? गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर प्रभास चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सज्ज

'आदिपुरुष' हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर प्रभास कॅमेऱ्यापासून लांबच राहिला होता.
प्रभासचा 'सालार' बॉक्स ऑफिस गाजवणार? गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर प्रभास चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सज्ज

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा प्रभास हा पुन्हा एका नव्या कारणाने चर्तेत आला आहे. आदिपुरुष' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसरवर काही खास कामगिरी केली नाही. 'आदिपुरुष' हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आता त्याच्या चाहत्यांना प्रभासच्या आगामी चित्रपट 'सालार: पार्ट सीझफायर' या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

प्रभास 'सालार' या चित्रपटाच्या रिलिजसाठी सज्ज झाला आहे. 'आदिपुरुष' हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर प्रभास कॅमेऱ्यापासून लांबच राहिला होता. या सगळ्यात प्रभास बऱ्याच दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त होता. सततच्या शुटिंगमुळे त्याची दुखापत खूपचं वाढली होती. त्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. त्यामुळे गुडघ्याच्या उपचारासाठी प्रभास युरोपला गेला होता. तिथं प्रभासवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता तो भारतात परत आला आहे.

'सालार' हा चित्रपट दोन भागात रिलीज होणार आहे. सालारमध्ये प्रभास व्यतिरिक्त श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू हे कलाकार दिसणार आहेत. 'सालार' हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर तो 'प्रोजेक्ट के' म्हणजेच 'कल्की 2898' या चित्रपटात देखील दिसणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in