प्रसाद ओक दिग्दर्शित नवा चित्रपट - 'वडापाव'

लंडनमध्ये चित्रपटाचा मुहूर्तसोहळा संपन्न
प्रसाद ओक दिग्दर्शित नवा चित्रपट - 'वडापाव'

गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला 'वडापाव' हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. प्रसाद ओक पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचं नाव 'वडापाव' असल्यामुळे प्रदर्शनाआधीच तो चर्चेत आला आहे. लंडनमध्ये नुकताच या चित्रपटाचा मुहुर्त सोहळा संपन्न झाला.

'वडापाव' या चित्रपटात सविता प्रभुणे,गौरी नलावडे,अभिनय बेर्डे,रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर,शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. . त्यामुळे अर्थातच प्रसाद ओकच्या आगामी 'वडापाव' चित्रपटाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

दिग्दर्शक प्रसाद ओक चित्रपटाविषयी सांगतात की प्रेमाला,लग्नाला आणि वडापाव खाण्याला वयाचं बंधन कधीही नव्हतं,नाही आणि नसेल. असं म्हणतात की “पुरुषाच्या मनात जाण्याचा रस्ता पोटातून जातो.” ह्या घरातल्या पुरषांच्या मनापर्यंत जाण्याच्या रस्त्यावर अनेक चमचमीत आणि झणझणीत जिन्नस आहेत, त्याची चव घ्यायला तयार रहा.

या चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांच्याकडे आहे.संगीतकार कुणाल करण 'वडापाव' या आगामी चित्रपटाचे संगीतकार आहेत तर मंदार चोळकर हे गीतकार आहेत. वडापाव हा चित्रपट प्रदर्शित कधी होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in