
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक एप्रिलमध्ये पार पडलील होती. आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती 2023-2028 ची निवडणूक मंगळवार रोजी पार पडली. या निडडणूकीत प्रशांत दामले यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तसेच उपाध्यक्ष (प्रशासन) म्हणून नरेश गडेकर यांची, उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्ष म्हणून सतीश लोटके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
या बरोबरच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या पंचवार्षीक निडणुकीत अजित भुरे यांचनी निवड करण्यात आली आहे. तर सहकार्यवाहक म्हणून समीर इंदुलकर, दिलीप कोरके आणि सुनिल ढगे यांची निवड करण्यात आली आहे. प्रशांत दामले यांच्या 'रंगकर्मी नाटक समूह' गटाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षीक निवडणुकी विजय मिळवला होता. या कार्यकारी समिती सदस्यांमध्येही 'रंगकर्मी नाटक समुहा'च्या 11 जणांची निवड करण्यात आली आहे. या 11 जणांमध्ये सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदिप तेंडुलकर, दीपर रेगे, संजय रहाटे, विजयकुमार साळुंखे, विशाल शिगाडे, संदीप पाटील, सविता मालपेकर, दीपा क्षिरसागर यांचा समावेश आहे.
यावेळी प्रशांत दामले यांची अध्यक्ष म्हणून निवड होताच त्यांच्या समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत एकच जल्लोष केला. यानंतर दामले यांनी पत्रकार पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, "पुढील पाच वर्षात अखिल भारतील मराठी नाट्य परिषद वेगळ्या उंचीवर जाईल. मी नाटकवाला असल्याने त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत. मी आणि माझे 60 सहकारी अ. भा. मराठी नाट्य परिषद, मराठी नाट्य परिषद आणि त्यांच्या सर्व शाखा यांच्या समस्या सोडवणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच नाव जरी अखिल भारतीय असले, तरी ती महाराष्ट्रपुर्तीच सीमीत आहे. तिला खऱ्या अर्थाने भारतात पोहचवण्याचे काम आम्ही करू. आता मी एवढेच बोलू शकतो, बाकी आम्हा 60 जणांचे काम बोलेल." असे दामले यावेळी म्हणाले.