प्रशांत दामले यांचं नवे ॲप ‘तिकिटालय’

मराठी नाटक, सिनेमा यांच्या बाबत माहिती रसिक प्रेक्षकांना पोहचतेच असं नाही.
 प्रशांत दामले यांचं नवे ॲप ‘तिकिटालय’
Published on

मराठी नाटक, सिनेमा यांच्या बाबत माहिती रसिक प्रेक्षकांना पोहचतेच असं नाही. त्यांच्या जाहिराती फक्त वर्तमानपत्रात पाहून त्या त्या प्रयोगांना त्यांना जावं लागत. तिकिटांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे आता मात्र रसिकांना प्रशांत दामले यांच्या पुढाकाराने घर बसल्या नाटकाची - सिनेमाची तिकिटं सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी मराठी मनोरंजनाचे ॲप ‘तिकिटालय’ आलं आहे. या ॲपवरून नाटक , चित्रपट, मैफली, कॉमेडी शोज या सगळ्यांची तिकिटं एका क्लिकवर मिळणार आहेत.

प्रशांत दामले, चंद्रकांत लोकरे आणि अभिजित कदम यांनी एकत्र येत पीएसी थिएटर एंटरटेन्मेंट प्रा. लिमिटेड अंतर्गत त्याची निर्मिती केली आहे. या ‘तिकिटालय’चा शुभारंभ जेष्ठ अभिनेते महाराष्ट्रभूषण अशोक सराफ, जेष्ठ निर्माते - दिग्दर्शक महेश कोठारे आणि मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून झाला नुकताचं झाला. प्रेक्षकांना मनोरंजनाच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती एकाच प्लॅटफॉर्मवरून मिळणार असल्यामुळे त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. अवघ्या तीन क्लिक वर तिकीट बुक करता येणार आहे. संपूर्ण भारतात हा ॲप कोणीही लोड करू शकतो. या नव्या ॲपबद्दल प्रशांत दामले म्हणाले, 'मराठी करमणुकीच्या क्षेत्रासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असे पाच - सहा महिन्यापासून डोक्यात होतं. 'तिकिटालय' ही संकल्पना मला सुचली. मराठी निर्मात्यांना सुद्धा हे अँप फार सोयीचं आहे. या ॲपवर मराठी नाटक सिनेमा याशिवाय मराठी कलाकृती विषयक माहिती मिळेल. मराठी निर्मात्यांनी जास्तीजास्त या अँपचा फायदा घेणं उचित ठरेल.' मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याचा आग्रह मी नेहमीच धरला आहे. नवनव्या संकल्पना येणं खूप गरजेचं आहे. तिकिटालय ही संकल्पना नक्कीच स्तुत्य असून याचा फायदा करून घेणं महत्वाचं असल्याचं राजसाहेब ठाकरे यांनी या सोहळ्यात सांगितले. 'गरज शोधा आणि पुरवा' असं मला नेहमी वाटत. त्यानुसार प्रशांत दामले यानी मनोरंजन क्षेत्राची आजची गरज ओळखून आलेलं तिकीटालय खरंच कौतुकास्पद असल्याची भावना महेश कोठारे यांनी व्यक्त केली . हे ॲप नक्कीच सर्वाना उपयुक्त ठरेल असं सांगत या नव्या ॲपला जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या .

logo
marathi.freepressjournal.in