"आमचं ठरलंय!" म्हणत प्रथमेश आणि मुग्धा यांनी दिला चाहत्यांना सुखद धक्का

"आमचं ठरलंय!" म्हणत प्रथमेश आणि मुग्धा यांनी दिला चाहत्यांना सुखद धक्का

त्यांची गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांसोबत मैत्री आहे

'सा रे ग म प लिटील चॅम्प्स'मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांसोबत मैत्री आहे. आता त्यांनी त्यांच्या मैत्रीच्या नात्याला पुढे नेत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

मुग्धा आणि प्रथमेश यांनी अनेक गाण्याचे कार्यक्रम एकत्र केले आहेत. अजूनही ते सोबत कार्यक्रम करतात. ते दोघे अनेकदा एकत्र देखील दिसतात. यामुळे एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज त्यांच्या चाहत्यांना होता. आता चाहत्यांना असलेला अंदाज खरा ठरला आहे. प्रथमेश आणि मुग्धाने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो शेअर करत आपलं नातं जाहीर केलं आहे.

त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "तुम्ही सर्व ज्या बातमीची वाट बघत होतात ती अखेर आम्ही सांगत आहोत. आमचं ठरलंय!" असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली देणं हा त्यांच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का होता. त्यांच्या या पोस्टनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांनी केलेल्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांसह कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in