प्रथमेश - मुग्धाला हळद लागली, पारंपरिक पद्धतीने पार पडला समारंभ; फोटो झाले व्हायरल
PM

प्रथमेश - मुग्धाला हळद लागली, पारंपरिक पद्धतीने पार पडला समारंभ; फोटो झाले व्हायरल

दोघे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहेत. त्या दोघांनी लग्नसमारंभाचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे
Published on

'सा रे ग म प लिटील चॅम्प्स' फेम गायक जोडी प्रथमेश लघाटे - मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाची धामधूम सध्या सुरु आहे. हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहेत. त्या दोघांनी लग्नसमारंभाचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. अशातच आता प्रथमेश - मुग्धाच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पारंपारिक पद्धतीने दोघांचा हळदी समारंभ पार पडला.

"हरिद्रा लापन । मांगलिक स्नान", "हरिद्रा लापन । घाणा भरणे" -

"हरिद्रा लापन । मांगलिक स्नान" असे कॅप्शन देऊन प्रथमेशने फोटो शेअर केले आहेत. तर "हरिद्रा लापन । घाणा भरणे", असे कॅप्शन देत मुग्धाने हळदीचे फोटो शेअर केले. या दोघांच्या हळदीच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांनी फार पसंती दर्शवली आहे. दोघांनी पारंपरिक थाटात हळदीचा समारंभ साजरा केल्याने चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

"आमचं ठरलंय" -

दोघांनी 15 जून रोजी पोस्ट शेयर करत त्यांच्या नात्याविषयी चाहत्यांना सांगितले होते. "आमचं ठरलंय", असे कॅप्शन देत त्यांनी त्यांच्या रिलेशनशीपचा सगळ्यांन समोर खुलासा केला होता. या व्हिडिओनंतर हे तर स्पष्ट झाले आहे की, दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला वेग आला आहे. दोघांच्या लग्नाची तारिखही लवकरच चाहत्यांना कळेल. त्यामुळे दोघांच्या लग्नाची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

logo
marathi.freepressjournal.in