सलमान खानच्या 'अंतिम' बाबत प्रविण तरडेंचं मोठं विधान ; म्हणाले, "त्या चित्रपटाशी..."

यावेळी प्रविण तरडे म्हणाले की, 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमान खान त्याची कॉलर उडवत म्हणत राहिला...
सलमान खानच्या 'अंतिम' बाबत प्रविण तरडेंचं मोठं विधान ; म्हणाले, "त्या चित्रपटाशी..."

२०२१ ला 'अंतिम द फायनल टृथ' हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शीत झालेल्या 'मुळशी पॅटर्न' या मराठी सिनेमाचा रिमेक होता. या चित्रपटामध्ये सलमान खानने एका शीख पोलिसाची भूमिका साकारली आहे. मेहुणा आयुष शर्मा हा देखील प्रमूख भूमिकेमध्ये आहे. महेश मांजरेकर हे या चित्रपदाचे दिग्दर्शक आहेत.

'बोल भिडू' या चॅट शो मध्ये मराठी अभिनेता प्रवीण तरडे यांनी सलमान खानच्या 'अंतिम' या सिनेमाविषयी मोठं विधान केलं आहे.. यावेळी त्यांनी सांगितलं की, "मुळशी पॅटर्न हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमान खान त्याची कॉलर उडवत म्हणत राहिला, 'काय चित्रपट, काय चित्रपट, काय चित्रपट.' पण जेव्हा त्याने मुळशी पॅटर्न या चित्रपटाचा रिमेक केला, तेव्हा त्याने त्यामध्ये गडबड केली. असं प्रविण तरडे म्हणाले आहेत. यावेळी 'अंतिम द फायनल टृथ' या सिनेमाविषयी बोलताना तरडे म्हणाले की, महेश मांजरेकरांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून माझा त्या चित्रपटाशी काहीही संबंध नव्हता. मी अजून ही 'अंतिम' नावाचा चित्रपट पाहिला नाही. मी हे असं धाडस दाखवणार नाही कारण की, माझ्या मनात आणि हृदयात फक्त 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट आहे. मला लोकांकडून कळले की 'मुळशी पॅटर्न' हा एक चांगला अप्रितीम चित्रपट आहे." असं तरडे म्हणाले.

'अंतिम'मध्ये महिमा मकवाना हिने पदार्पणही केलं असून आयुषने या चित्रपटात एका आक्रमक, गुंडाची भूमिका साकारली आहे. सलमान खान आणि आयुष या दोघांनाही चित्रपटासाठी त्यांच खूप शारीरिक बदल करावे लागले आहेत.

सलमान खान आता कतरिना कैफसोबत 'टायगर 3' या सिनेमात मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर' चा हा तिसरा भाग आहे. 2012 मध्ये कबीर खान दिग्दर्शित 'एक था टायगरचा' हा पहिला भाग प्रदर्शित झाल असून दुसरा 'टायगर जिंदा है' 2017 मध्ये रिलीज झाला होता, तो अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in