प्रियांका चोप्राचा २०४ कोटींचा नेकलेस!

पहिल्याच दिवशी प्रियांका चोप्राने ब्लॅक ड्रेस आणि डायमंड नेकलेसने जिंकली मनं
प्रियांका चोप्राचा २०४ कोटींचा नेकलेस!

मेट गाला या आंतरराष्ट्रीय फॅशन इव्हेंटमध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्राने पाहिल्याच दिवशी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं . जेव्हा प्रियांका चोप्रा जोनास न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या खास पायऱ्यांवर पोहचते फॅशन ची एक वेगळी झलक सगळ्यांना पहायला मिळाली. प्रियांका च्या फॅशनने सगळ्यांची मन जिंकून घेतली. तेथील उपस्थित लोकांनी तिचं भरभरून कौतुक केलं. " सुंदर , अप्रतिम " अश्या शब्दात तिचं कौतुक सगळ्यांनी केलं.

'कार्ल लेजरफिल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी' या थीम नुसार प्रियांका चोप्रा जोनास हिने व्हॅलेंटिनो ब्लॅक कॅडी स्ट्रॅपलेस ड्रेस आणि पांढऱ्या धनुष्यासह ब्लॅक फेल केपसह लेदर ग्लोव्हज घालून जर्मन डिझायनरला योग्य श्रद्धांजली वाहिली. .

आणि विशेष म्हणजे तिने जो डायमंड नेकलेस घातलाय त्याची किंमत २०४ कोटी आहे. 'बल्गरी' या डिझाइनर ब्रँडचा हा नेकलेस ११.६ केरेटचा आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा प्रियंकाकडे वळल्या.

तिचा मेकअप सारा तन्नो यांनी केला आहे. प्रियांका चोप्रा जोनास आणि टॅनो यांनी क्लासिक मॉर्डन लूक एकत्र करून एक नवीन लूक तयार केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in