प्रियंका चोप्रा 'डॉन 3'च्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार? चर्चांना उधाण

फरहान अख्तरने नुकतंच काही दिवसांआधी 'डॉन 3' या चित्रपटाची घोषणा केली होती.
प्रियंका चोप्रा 'डॉन 3'च्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार? चर्चांना उधाण

बॉलीवूड ते हॉलिवूड आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपासून एकच चर्चा चालू आहे. ती म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये जबरदस्त एन्ट्री मारणार आहे. या आधी प्रियंका फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार होती. पण हा चित्रपट रखडला. मात्र, आता पुन्हा प्रियंकाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे.

प्रियंका चोप्रा आता फरहानच्या सुपरहिट फ्रँचायझी 'डॉन'च्या 'डॉन 3'मध्ये पुन्हा कमबॅक करणार असल्याचा दावा मिडिया रिपोर्टनुसार केला जातं आहे. फरहान अख्तरने नुकतंच काही दिवसांआधी 'डॉन 3' या चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र आता डॉनच्या भूमिकेत बॉलीवूडचा किंग शाहरुख खान नाही तर, रणवीर सिंग दिसणार आहे. शाहरुख खान 'डॉन' फ्रँचायझीमधून बाहेर आहे. त्यामुळे आता 'डॉन ३' चित्रपटात प्रियंका चोप्रा रणवीर सिंगसोबत दिसणार आहे, असं बोलल जात आहे.

मिडीयाने दिलेल्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री प्रियंका चोप्रा नुकतीच फरहान अख्तरला भेटली होती. त्यांनी 'डॉन 3' वर चर्चा केली. त्यानंतर आता अभिनेत्री प्रियंका चोप्राने 'डॉन 3' या चित्रपटाच्या लीड रोलसाठी होकार दिला आहे. असं बोललं जातं आहे. यापूर्वी 'डॉन 3' साठी कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन यांच्या नावाची चर्चा सुरु होती. फरहानची 'डॉन' चित्रपटांची फ्रेंचाइजी 2006 मध्ये सुरू झाली होती. या चित्रपटात शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, करीना कपूर आणि अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका होत्या. यानंतर 2011 मध्ये डॉनचा दुसरा भाग आला. आता 12 वर्षांनंतर फरहान या चित्रपटाचा तिसरा भाग 'डॉन 3' घेऊन येणार आहे, ज्यामध्ये रणवीर पहिल्यांदाच डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in