प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या बहिणीचा मृत्यू; नातेवाईकांना घातपाताचा संशय

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या बहिणीचा मृत्यू; नातेवाईकांना घातपाताचा संशय

मराठी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेली मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा मृत्यू झाला. मात्र, हा मृत्यू आता संशयास्पद असल्याची चिंता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

काल अभिनेत्री भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावरुन तिची बहीण मधू मार्कंडेय- मोटे हिच्या मृत्यूची माहिती दिली. मात्र, आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, तिच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या असून आता वाकड पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधू मोटे- मार्कंडेय केक बनवण्याचा व्यवसाय करत होत्या. व्यवसाय वाढण्याच्या हेतूने ती आणि तिची मैत्रीण रूम पाहण्यासाठी गेल्या होत्या. तिकडे मधूला अचानक चक्कर आली आणि खाली कोसळली. तिच्या मैत्रिणीने तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, त्यांना महानगर पालिकेच्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी मधूला मृत घोषित केले. या सर्व प्रकारानंतर आता मधूच्या नातेवाईकांनी तिचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली. यावर वाकड पोलिसांनी तिच्या शरीरावर गंभीर दुखापत नसल्याचे सांगितले. तिचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली. आता या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in