विकी कौशलमुळे पंजाबी गायक झाला स्टार!

व्हायरल डान्स व्हिडिओची कमाल
विकी कौशलमुळे पंजाबी गायक झाला स्टार!

विकी कौशलचा व्हायरल झालेला डान्स व्हिडिओ तुम्हीसुद्धा नक्कीच पहिला असेल? एका मुलाखतीदरम्यान विकी कौशलने पंजाबी गाण्यावर डान्स केला आणि तो व्हिडिओ पाहता पाहता सगळीकडे व्हायरल झाला. नंतर विकी कौशलने त्याच ‘ओब्सेस्ड’ या गाण्यावरील व्हिडीओ काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करताना विकीने रिआर साब या पंजाबी गायकाला टॅग केले . या व्हिडीओमुळेच रिआर साबच्या ‘ओब्सेस्ड’ गाण्याची लोकप्रियता प्रचंड वाढली.

पंजाबी गायक रिआर साबला फारसं कोणी ओळखत नव्हते, परंतु त्याच्या ‘ओब्सेस्ड’ (obsessed) गाण्याने त्याला रातोरात स्टार बनवले. रिआरच्या ‘ओब्सेस्ड’ गाण्यावर आता सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ बनवण्यात आले आहेत. आपल्या गाण्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून रियार साब खूप आनंदी आहे. याचे संपूर्ण श्रेय रिआरने विकी कौशलला दिलं आहे.

एका मुलाखतीदरम्यान रिआर म्हणाला, “या गाण्याला दिलेल्या भरभरून प्रतिसादासाठी मी माझ्या सगळ्या चाहत्यांचे आभार मानतो. अलीकडच्या काळात तुमचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होणे गरजेचे आहे, अशी व्हायरल झालेली गाणी तुमची एक नवी ओळख बनवतात.''

.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in