रेडिओ सिटीचा 'क्रिकेट का ब्लॉकबस्टर' दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैना करणार सादर

रेडिओ सिटीच्या ‘क्रिकेट का ब्लॉकबस्टर’चे अधिकृत होस्ट म्हणून सुरेश रैनाची नियुक्ती करण्यात आली आहे.
रेडिओ सिटीचा 'क्रिकेट का ब्लॉकबस्टर' दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैना करणार सादर

सध्या आयपीएल स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. त्याची रंगतदार माहिती देण्यासाठी रेडिओ सिटी या रेडिओ वाहिनीने प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाला मनोरंजनाच्या पीच वर उतरवले आहे. रेडिओ सिटीच्या ‘क्रिकेट का ब्लॉकबस्टर’चे अधिकृत होस्ट म्हणून सुरेश रैनाची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी ६४ दिवस सुरेश रैनासोबत क्रिकेटविषयी रंजक माहिती, सामन्यांचे विश्लेषण, खेळाडूंच्या गमती-जमती हे सारं रेडिओ सिटीच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांना अनुभवता येणार आहे.

''क्रिकेट का ब्लॉकबस्टर कार्यक्रमातून सुरेश रैना सारख्या दिग्गज खेळाडूला ऐकणे क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असेल. या कार्यक्रमातून क्रिकेट रसिकांचे मनोरंजन होईल याचा विश्वास आहे,'' असे मत रेडिओ सिटीचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर कार्तिक कल्ला यांनी व्यक्त केले. सुरेश रैनाने आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले कि, ''रेडिओ सिटीने `क्रिकेट का ब्लॉकबस्टर' हा उत्तम कार्यक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमाद्वारे क्रिकेट रसिकांसोबत क्रिकेटच्या गमती जमती शेअर करण्यासाठी उत्साही आहे.''

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in