राहुल आणि आथियाचा शाही विवाहसोहळा आज पार पडणार ; रिसेप्शनमध्ये 3000 पाहुणे असण्याचा अंदाज

आथियाला चार वर्षे डेट केल्यानंतर केएल राहुल अखेर आज बोहल्यावर चढणार आहे. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या बंगल्यावर त्यांचा शाही विवाहसोहळा
राहुल आणि आथियाचा शाही विवाहसोहळा आज पार पडणार ; रिसेप्शनमध्ये 3000 पाहुणे असण्याचा अंदाज

क्रिकेटपटू केएल राहुल आणि सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आज विवाहबंधनात अडकणार आहे. अथियाला चार वर्षे डेट केल्यानंतर केएल राहुल अखेर आज बोहल्यावर चढणार आहे. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या बंगल्यावर त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि केएल राहुल दुपारी 4 वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता ते कुटुंबासह मीडियाला भेटतील. 

सर्वांच्या नजरा अथिया आणि केएल राहुलच्या भव्य रिसेप्शनकडे लागल्या आहेत. अथिया-केएल राहुलच्या भव्य रिसेप्शनला बॉलिवूड तसेच क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. या रिसेप्शनमध्ये 3000 पाहुणे उपस्थित राहतील असा अंदाज आहे. अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in