सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली. यानंतर सिनेसृष्टीतून, राजयकीय तसंच सामजित क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी त्यांच्या आदरांजली वाहिली. देसाई यांची जवळपास सगळ्याचं राजकारण्यांशी मैत्री होती. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
नितीन देसाई यांनी आदरांजली वाहताना राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ज्येष्ट कला दिग्दर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली. त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैसा हा मोठाच असावा लागतो. आणि असा पैसा असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो. त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो. हे अनाकलनीय आहे. नितीन धिराचा माणूस होता. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता. त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल याचा छडा लागला पाहीजे. असो, कोणावरही अशी वेळ येऊ नये. हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमांचं कला दिग्दर्शन केलं आहे. तसंच अनेक इतिहासकालीन मालिकांमध्ये देखील कला दिग्दर्शनाचं काम त्यांनी केलं आहे. नितीन देसाई यांच्या जाण्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.