
राज ठाकरे यांचं भाषण असो किंवा मुलाखत ती नेहमी रंगतेच. पुन्हा एकदा एक असा योग जुळून आलाय ज्यात राज ठाकरे अगदी त्यांच्या मनातलं काहीतरी बोलून गेले . 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा नवा सीझन सुरु होत आहे. पहिल्याच एपिसोडचे राज ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. अवधूत गुप्ते यांचे प्रश्न आणि राज ठाकरे यांची बिनधास्त बेधडक उत्तरं पहायला मिळणार आहेत.
नेहमीच कडक बोलणारे राज ठाकरे यांची हळवी बाजूदेखील या कार्यक्रमात दिसणार आहे. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे बालपण हे एकत्र गेले.त्यांनी बाळासाहेबांसोबत राजकारणाचे धडेही एकत्रच गिरवले. अवधूत गुप्ते यांनी उद्धव ठाकरे , बाळासाहेब ठाकरे , आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो दाखवत "कस वाटतय हे सगळं बघून" असा प्रश्न विचारला असता त्यावर राज ठाकरे भावुक होत म्हणाले, "खुप छान दिवस होते ते. माहित नाही मला, कोणीतरी विष कालवलं आमच्या नात्यात"
एकंदरच राज ठाकरे यांचे भावनिक आणि मिश्किल असे दोन्ही पैलू या कार्यक्रमात पाहायला मिळतील.