मोठ्या पडद्यावर अवतरणार 'महाभारत'

'बाहुबली' चे दिग्दर्शक राजामौली यांचा ड्रीम प्रोजेक्ट
मोठ्या पडद्यावर अवतरणार 'महाभारत'
Published on

'बाहुबली', 'बाहुबली २', 'RRR' यांसारखे भव्य चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केले ते राजामौली यांचं नाव केवळ भारतातच नाही तर परदेशातही आता ओळखीचं झालं आहे. त्यांचा यापुढील सिनेमा कोणता असेल याची उत्सुकता सर्वांनाच होती. नुकतंच त्यांनी त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट काय आहे ते सांगितलं. राजामौली यांना 'महाभारत' मोठ्या पडद्यावर आणायचं आहे. ते महाभारत असं असेल ज्याची प्रेक्षकांनी कधीही कल्पना केली नसेल किंवा पाहिलं नसेल. दहा भागांमध्ये 'महाभारत' त्यांना आणायचं आहे.

एका मुलाखतीत याविषयी बोलताना राजामौली म्हणाले, “जर मी आज ‘महाभारत’ बनवायचा निर्णय घेतला तर त्यासंदर्भात मला वाचन करण्यात एक वर्षं जाईल. सध्या याबाबत बोलायचं झालं तर हा चित्रपट १० भागात बनू शकतो एवढा मोठा आहे.मी महाभारतासाठी जेव्हा पात्रं लिहिन ती तुम्ही आजवर पाहिलेल्या पात्रांप्रमाणे नसतील. मला माहीत आहे प्रेक्षकांनी आधीच कोणता कलाकार कोणतं पात्र साकारणार, याबद्दल चर्चा सुरू केली आहे. मी जेव्हा ती पात्रं लिहिन तेव्हाच याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकेन.”

logo
marathi.freepressjournal.in