रजीकांच्या 'जेलर'ची सर्वत्र हवा, चाहते म्हणतात, "हा तर..."

चेन्नई आणि बंगळुरमधील अनेक कंपन्यांनी आज हा सिनेमा बघण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.
रजीकांच्या 'जेलर'ची सर्वत्र हवा, चाहते म्हणतात, "हा तर..."

दाक्षिणात्य सिनेमांचा सुपरस्टार रजनीकांत याचा 'जेलर' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रजनीकांतच्या 'जेलर' या चित्रपटाची अनेक महिन्यांपासुन त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टॉलीवूडच्या प्रेक्षकांसाठी रजनीकांत हा देव आहे. लोक त्याला देवाच्या जागेवर पूजतात. त्याने आजपर्यंत खूप ब्लॉकब्लस्टर सिनेमे केले आहेत. चेन्नई आणि बंगळुरमध्ये अनेक कंपन्यांनी आज कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. या आधी या चित्रपटाच्या प्रोमो आणि ट्रेलरने चांगलीच हवा केली होती. सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' हा फिव्हर न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर पोहोचला आहे.

वयाची सत्तरी पार केले असून सुद्धा रजनी यांचा वेगळा अंदाज या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. चक्क दोन वर्षानंतर रजनीकांत याचा चित्रपट प्रदर्शित झाला असून सकाळपासून थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहायला पहाटे पासून लोकांच्या रांगा थिएटर बाहेर दिसत होत्या. रजनीकांतचा 'जेलर' पाहून त्याचे चाहते त्याला ट्विटरवर प्रतिक्रिया देत आहेत. खूप लोकांनी तर फटाके फोडले, काहींनी दूधाने अभिषेक केला, काहीजण थिएटरबाहेर ढोल-ताशांवर नाचले सुद्धा. फॅन्स आता ट्विटरवर 'जेलर'चे त्यांचे रिव्ह्यू शेअर करत आहेत.

एका फॅन्सने ट्विट केले की, "भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम क्लायमॅक्स." याशिवाय अनेकांनी 'जेलर'ला 'ब्लॉकबस्टर' असं सुद्धा म्हटलं. अनेक चाहत्यानी जेलरच्या बॅकग्राऊंड म्युझिकचं कौतुक केलंय तसंच रजनीकांतच्या अभिनयाचं पण कौतुक केलंय. थोडक्यात हा सिनेमा एकदम मसाला एंटरटेनमेंट आहे. 'जेलर' हा चित्रपट सर्वांनां आवडला आहे खूप लोकांनी सिनेमाच्या क्लायमॅक्सच कौतुक केल्यामुळे नेमकं सिनेमाच्या शेवटी घडतं काय? हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in