ताप आल्याने राजू श्रीवास्तव पुन्हा व्हेंटिलेटरवर

तेव्हापासून राजू श्रीवास्तव बेशुद्ध होते. राजूवर अँजिओग्राफीही करण्यात आली. त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज असल्याचे आढळून आले
ताप आल्याने राजू श्रीवास्तव पुन्हा व्हेंटिलेटरवर
Published on

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू श्रीवास्तव यांचे चाहते ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करून जवळपास महिना झाला आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार सुरूच आहेत. नुकतेच त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. मात्र, पुन्हा ताप आल्याने राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसल्यानंतर त्यांना मंगळवारी व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. ते उपचारांनाही प्रतिसाद देत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 100 डिग्री तापामुळे राजूला पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव स्वतः 80-90 टक्के नैसर्गिक ऑक्सिजन घेत आहेत. त्याचे चाहते, कुटुंबीय आणि त्याचे मित्र त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव यांना पाहण्यासाठी जॉनी लीव्हर, सुनील पाल आणि अनेक विनोदी कलाकारही रुग्णालयात गेले होते. राजू श्रीवास्तव जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून राजू श्रीवास्तव बेशुद्ध होते. राजूवर अँजिओग्राफीही करण्यात आली. त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज असल्याचे आढळून आले.

logo
marathi.freepressjournal.in