Rakhi Sawant : राखी सावंतच्या पतीला झाली अटक; हे कारण आले समोर

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही सध्या तिच्या पती आदिल खानसोबतच्या वादामुळे चर्चेत असून तिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत
Rakhi Sawant : राखी सावंतच्या पतीला झाली अटक; हे कारण आले समोर

गेले काही दिवस अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही चांगलीच चर्चेत आहे. आधी तिने आदिल खान (Adil Khan) दुर्रानीसोबत लग्न केल्यानंतर ती सतत चर्चेत राहिली आहे. आता तर राखी सावंतच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी तिचा पती आदिल खानला ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेनंतर राखीने माध्यमांशी संवाद साधला असता ती म्हणाली की, "आदिल सकाळी मला मारण्यासाठी घरे आला होता. म्हणून मीच नंतर पोलिसांकडे तक्रार केली."

हेही वाचा:

राखी सावंतने पती आदिल खानवर केले 'हे' गंभीर आरोप

राखीने माध्यमांना सांगितले की, "आदिल मला फोन करून भेटण्यास विचारत होता. मी नाही म्हणत होते, तरीही तो घरी आला म्हणून मी तक्रार दिली. माझे त्याच्याशी पॅचअप झालेले नाही. तो माझा पती आहे, मी त्याला घास भरवला म्हणून सगळे ठिक झाले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही." असे तिने म्हंटले. राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आदिलचा क्रिमिनल रेकॉर्ड असून त्याने मला मारहाण केली, असेदेखील तिने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in