राखीच्या अडचणीत आणखी वाढ होणार? जीवलग मैत्रीनीनेच केली पोलिसांत तक्रार

राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आला. यानंतर त्याने पत्रकार परिषद घेत राखीवर अनेक गंभीर आरोप केले. आता...
राखीच्या अडचणीत आणखी वाढ होणार?  जीवलग मैत्रीनीनेच केली पोलिसांत तक्रार

ड्रामा क्विन राखी सावंत ही कायम कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिला माध्यमांच्या नजरेत राहायला फार आवडतं. त्यामुळे ती असं काही तरी करत असते, ज्याने ती कायम चर्चेत राहील. राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी जेलमधून काही दिवसांपूर्वीच बाहेर आला. सहा महिन्यांनंतर जेलमधुन बाहेर येत आदिलनं पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्याने राखीवर अनेक गंभीर आरोप केले.

तर राखीने देखील पत्रकार परिषद घेऊन अदिलच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्यातच आता आदिलने राखीवर आरोप करत त्याच्याकडे सगळे पुरावे असल्याचं सांगितलं. तेव्हा पासून राखी सावंतच्या अडचणी खूप वाढल्या आहेत. त्यातच आता राखीची जिवलग मैत्रीण राजश्री देखील राखीच्या विरोधात गेली आहे. राजश्रीने राखी सावंतच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

यात राजश्री म्हणाली की, जेव्हापासून आदिल मीडियासमोर राखीविरोधात बोलला आहे. तेव्हापासून राखी सावंत त्याला धमक्या देत होती. याशिवाय राजश्रीने काहीही बोलण्यास नकार दिला. ती लवकरच मीडियासमोर सर्व काही उघड करणार असल्याचे तिनं म्हटलं आहे.

राजश्रीच्या पोलीस तक्रारीनंतर आता राखी सावंतने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राखीने 'वायरल भयानी'च्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. तिने कमेंट करत लिहिले की, "आपण दोघीही एकमेकांच्या वाईट काळात एकमेकांसोबत होतो. तू माझी एक चांगली मैत्रीण आहेस. मला खूप मोठा धक्का बसला आहे. मला समजत नाही माझ्या आयुष्यात काय चालू आहे. शाब्बास आदिल! तू पुन्हा एकदा माझा मित्रांचा वापर केला आहे. मी प्रत्येक गोष्टीविरुद्ध लढेन. माझ्यासोबत माझा देव आहे", अशी प्रतिक्रिया राखीने दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in