ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर- आलियाने दाखवला लेकीचा चेहरा; पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील गोड राहाचे होतंय सर्वत्र कौतूक 

या दोघांना राहा ही मुलगी आहे. राहाच्या जन्मानंतर दोघांनीही तिला मीडियापासून दूर ठेवले होते.
ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर- आलियाने दाखवला लेकीचा चेहरा; पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील गोड राहाचे होतंय सर्वत्र कौतूक 

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडी सध्या चित्रपटसृष्टीत चांगलीच चर्चेत आहे. रणबीरचा अॅनिमल हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. तर आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमांनी चांगलीच हवा केली होती. 

या दोघांना राहा ही मुलगी आहे.  राहाच्या जन्मानंतर दोघांनीही तिला मीडियापासून दूर ठेवले  होते. पण आज ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर-आलियाने लेकीला सर्वांसमोर आणले आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हे दोघे आज ख्रिसमसच्या निमित्ताने मीडियासमोर आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची लेक राहा देखील होती. यावेळी राहा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुपच सुंदर दिसत होती. यावेळी राहाचे सर्वांकडून कौतूक होत होते. रणबीर आणि आलिया सुद्धा सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते.

आलिया आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले होते. रणबीरच्या मुंबईतील 'वास्तू' या निवासस्थानी हा विवाहसोहळा पार पडला होता. लग्नानंतर जवळपास २ महिन्यानंतर आलियाने आई होणार असल्याची गोड  बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव त्यांनी राहा असे ठेवले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in