रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर हवा; रिलीजआधी केली तब्बल 'एवढ्या' कोटींची कमाई

सॅकनिल्क एन्टटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचे देशभरात एकूण 7 लाख 45 हजार 992 तिकीट विकले गेले आहेत
रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर हवा; रिलीजआधी केली तब्बल 'एवढ्या' कोटींची कमाई

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट उद्या प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागून आहे. रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची क्रेझ सध्या सर्वत्र पसरली आहे. ओपनिंग डेला हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करेल असं देखील म्हटलं जात आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, गाणी आणि पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलेच उतरले आहे. त्यामुळे आता या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सॅकनिल्क एन्टटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचे देशभरात एकूण 7 लाख 45 हजार 992 तिकीट विकले गेले आहेत. 'अ‍ॅनिमल'चे हिंदी भाषेत 2डीमध्ये आतापर्यंत 10703 शोचे पाच लाख 75 हजार 197 तिकीटांची अ‍ॅडव्हान्समध्ये विक्री झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने 17 कोटी 16 लाख 50 हजार 751 रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.

'अ‍ॅनिमल'च्या तेलुगू भाषेत देखील दोन कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 'अ‍ॅनिमल'चे ओपनिंग डेचे 1503 शोपैकी 163361 तिकीट विकले गेले आहेत. तामिळमध्ये 'अ‍ॅनिमल'चे 124 शोपैकी 5861 तिकीट विकले गेले आहेत. तामिळमध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने 7 लाख 16 हजारपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर कन्नड वर्जनचे 1553 तिकीट विकले गेले असून 1 लाख 95 हजार रुपयांपेक्षा अधिक कमाई या चित्रपटाने केली आहे. एकंदरीतच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने तब्बल 19.7 कोटींची कमाई केली आहे.

'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू या भाषांमध्ये रिलिज होणार आहे. रणबीर कापूरसह या चित्रपटात रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, शक्ती कपूर आणि सुरेश ओबेरॉय यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका असतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in