
''डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकीन है'' हा डायलॉग सर्वांना आठवतच असेल . पण सध्या मात्र अशी वेळ आलेय की नक्की कोणत्या डॉनला पकडायचं आणि कुणाला खरा डॉन म्हणायचं. अमिताभ बच्चन यांनी अजरामर केलेल्या डॉन या व्यक्तिरेखेला शाहरुख खानने देखील मोठ्या पडद्यावर साकारलं. १९७८ मध्ये अमिताभ बच्चन यांचा डॉन आला आणि २००६ मध्ये डॉनचा रिमेक आला. २०११ मध्ये डॉन -२ आला आणि तोदेखील सुपरहिट झाला. आता चर्चा अशी आहे की डॉन -३ कोण करणार?
शाहरुख खान ने स्वतःच दिला नकार ?
निर्माता रितेश सिधवानी यांनी अखेर 'डॉन'चा तिसरा भाग येणार असल्याची घोषणा केली आहे. रितेश आणि दिग्दर्शक फरहान अख्तर सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. शाहरुख खान 'डॉन ३'चा भाग नसल्याची बातमी समोर आली होती. कारण शाहरुख खानला स्क्रिप्ट आवडली नाही आणि पठाण नंतर सेकंड इंनिंगमध्ये शाहरुख खान कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही असंही बोललं जातंय.
रणवीर सिंग असेल नवा 'डॉन'
आता नव्या माहितीनुसार डॉन म्हणून रणवीर सिंगला कास्ट केल्याचे म्हटले जात आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खाननंतर आता बॉलिवूडचा नवा 'डॉन' होणार आहे रणवीर सिंग.
रणवीर सिंगने या आधी 'दिल धडकने दो' आणि 'गली बॉय' या एक्सेल एंटरटेनमेंटच्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे निर्मात्यांसोबत आणि फरहान अख्तरसोबत त्याचं चांगलं ट्युनिंग आहे. रणवीर सिंग डॉन च्या व्यक्तिरेखेला न्याय देणार का हेच पाहायचं.