Ravindra Berde Passed Away : चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन; 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रविंद्र बेर्डे यांनी आपल्या भूमिकांमधून स्वतःची एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली होती
Ravindra Berde Passed Away : चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन; 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
PM

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे आज निधन झाले आहे. रवींद्र बेर्डे यांनी वयाच्या 78व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेले अनेक वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रासलेले होते. त्यांच्यावर काही महिन्यांपासून मुंबतील टाटा रुग्णालयात उपचार देखील सुरू होते.

रविंद्र बेर्डे यांनी आपल्या भूमिकांमधून स्वतःची एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली होती. त्याची अजून एक ओळख म्हणजे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत देखील त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यांच्यावर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान गेले दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयायातून घरी सोडण्यात आले होते.

घरी आल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले आहे . रविंद्र बेर्डे यांनी 1965 मध्ये रंगभूमीवर पदार्पण केले होते. 300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

मराठी अभिनेते अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबत रवींद्र बेर्डे यांची जोडीला पडद्यावर प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळाले होते. रवींद्र बेर्डे मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांनी काम केले होते. सिंघम, चिंगी यांसारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. 1995 मध्ये नाटकाच्या रंगमंचावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता . यानंतर 2011 साली त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले.

रविंद्र बेर्डे यांनी मराठी चित्रपट आनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, हाच सुनबाई चा भाऊ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे .

logo
marathi.freepressjournal.in