रिया चक्रवर्तीला परदेशी जाण्याची परवानगी; सुशांत सिंग राजपूत प्रकरण

सुशांतसिह मृत्यूप्रकरणी तपास यंत्रणांच्या रडारवर असणाऱ्या रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती
रिया चक्रवर्तीला परदेशी जाण्याची परवानगी; सुशांत सिंग राजपूत प्रकरण
PM

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि सीबीआयच्या लूकआउट नोटीसमुळे परदेशात जाण्यापासून रोखलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने मंगळवारी दिलासा दिला. सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने २७ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान रियाला परदेश प्रवासासाठी परवानगी दिली.

सुशांतसिह मृत्यूप्रकरणी तपास यंत्रणांच्या रडारवर असणाऱ्या रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. अटकेनंतर हायकोर्टाने ऑक्टोबर २०२० मध्ये रियाला सशर्त जामीन मंजूर केला. दरम्यान, सीबीआयच्या लूकआउट नोटिशीला रियाने हायकोर्टात आव्हान दिले होते. ही याचिका प्रलंबित असल्याने नोटिशीला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला आहे.

या अर्जावर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान रियाच्या वतीने अ‍ॅड अभिनव चंद्रचूड यांनी सीबीआयने एफआयआर दाखल करून आणि लुकआउट परिपत्रक जारी करून जवळपास तीन वर्षे झाली आहेत, परंतु आजपर्यंत कोणतीही प्रगती झालेली नाही. यापूर्वी परवानगी मिळूनही या सीबीआयच्या आऊटलूक नोटीसीमुळे परदेशात जाता आले नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच पाळीव प्राण्यांच्या खाद्य कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने रियाला २७ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत परदेश प्रवासासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली. तर सीबीआयच्या वतीने अ‍ॅड. श्रीराम शिरसाट यांनी याचिकेलाच आक्षेप घेतला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in