Rhea Chakraborty: “तुम्हाला काय वाटलं…मी परत नाही येणार' असा रियाचा दावा तर, सुशांतच्या बहिणीकडून पुन्हा 'या' शब्दात अपमान

केवळ सत्तेत असलेल्या कोणीतरी असे करण्याचे धाडस करेल. या प्रकरणाच्या विलंबाला कोण जबाबदार आहे, हे...
Rhea Chakraborty: “तुम्हाला काय वाटलं…मी परत नाही येणार' असा रियाचा दावा तर, सुशांतच्या बहिणीकडून पुन्हा 'या' शब्दात अपमान

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. 'एम टीव्ही वरील रोडीज' या रिअॅलिटी शोच्या नव्या सीझनमध्ये रिया एका गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'MTV रोडीज'च्या 19व्या सीझनचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला. या प्रोमो व्हिडिओमध्ये रिया चक्रवर्तीची ओळख गँग लीडर म्हणून करण्यात आली होती. एमटीव्ही रोडीजच्या या प्रोमो व्हिडिओमध्ये रिया दमदार अभिनय करताना दिसली. यासोबतच रियाने व्हिडिओमध्ये असेही म्हटले आहे की, “तुम्हाला काय वाटलं…मी परत नाही येणार?…मी घाबरले?…आता घाबरण्याची वेळ दुसऱ्यांची आहे,” रियाच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

एमटीव्ही रोडीजच्या या व्हिडिओनंतर सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने केलेल्या ट्विटची चर्चा झाली आहे. सुशांतच्या बहिणीने ट्विट केले की, “तू का घाबरशील? तू तर वेश्या होतीस, आहेस आणि राहशील. प्रश्न हा आहे की तुझे उपभोगता कोण आहेत?  केवळ सत्तेत असलेल्या कोणीतरी असे करण्याचे धाडस करेल. या प्रकरणाच्या विलंबाला कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट झाले आहे. तीन वर्षांपूर्वी 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतने मुंबईत आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in