व्हायरल झालेल्या 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर थिरकला रिकी पाँड

आगामी मराठी चित्रपट 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास नवा' सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले
व्हायरल झालेल्या 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर थिरकला रिकी पाँड

आगामी चित्रपट 'महाराष्ट्र शाहीर'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशामध्ये या चित्रपटाचे 'बहरला हा मधुमास नवा' हे गाणे सोशल मीडियावर आले आणि चांगलेच व्हायरल झाले आहे. अनेक कलाकार रिल्सवरून या गाण्यावर थिरकताना दिसले आहे. अशामध्ये रिल्ससाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँडलादेखील या गाण्याची भुरळ पडली. त्यानेदेखील या गाण्यावर आपले एक रील शेअर केले आहे, जे सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध रील स्टार रिकी पाँड हा अमेरिकेतील एक सोशल मीडिया रील स्टार आहे. यापूर्वीही त्याने अनेकदा व्हायरल झालेल्या भारतीय गाण्यांवर रील बनवले आहेत. त्याने नुकतेच महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावर थिरकत एक रील शेअर केले. त्याने यावेळी कॅप्शनमध्ये म्हंटले की, "मला वाटत आहे की, मी छान डान्स केला. मला या गाण्याची हुक स्टेप आवडली." त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट दिवंगत लोकशाहीर शाहीर साबळे यांच्यावर आधारित आहे. यामध्ये शाहीर साबळेंची प्रमुख भूमिका अभिनेता अंकुश चौधरी साकारत आहे. तसेच, केदार शिंदेची मुलगी सना शिंदे ही या चित्रपटातून पदार्पण करत आहे. अजय-अतुल यांनी संगीत दिग्दर्शन केले असून २८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in