रिंकू राजगुरू-ललित प्रभाकरचा रोमँटिक अंदाज

फोटोवरून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण
रिंकू राजगुरू-ललित प्रभाकरचा रोमँटिक अंदाज
INSTAGRAM

रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. या जोडीने यापूर्वी कोणताच सिनेमा एकत्र केला नसल्यामुळे हे दोघं अचानक एकत्र कसे , असा अनेकांना प्रश्न पडला आहे. एवढंच नाही, तर त्यांचे फोटो पाहून रिंकू राजगुरू -ललित प्रभाकर रिलेशनशिपमध्ये आहेत कि काय असंही बोललं जात होतं .

पण खरी बातमी अशी आहे की ,रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर लवकरच एका चित्रपटात झळकणार आहेत.

महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपटात पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या 'खिल्लार' या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार आहे. तळेगाव मावळ इथं झालेल्या पुणे जिल्हा केसरी भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीवेळी 'खिल्लार' चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तसंच चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं.

.

INSTAGRAM

मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून स्थान निर्माण केलेल्या मकरंद मानेनं दिग्दर्शित केलेला 'रिंगण' हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यानंतर मकरंद मानेनं 'यंग्राड', 'कागर', 'सोयरीक', 'पोरगं मजेतंय' हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मूळचा पश्चिम महाराष्ट्रातला असल्यानं मकरंदनं बैलगाडा शर्यतींचं वातावरण अतिशय जवळून पाहिलं आहे. त्यामुळेच आता हा विषय तो 'खिल्लार' चित्रपटातून मांडत आहे. रिंकू राजगुरूनं 'कागर' या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्यामुळे मकरंद आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. तर मकरंद आणि रिंकू यांच्याबरोबर ललित प्रभाकर पहिल्यांदाच काम करत आहे.

रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर यांची फोटोमधील केमिस्ट्री पाहता या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर शोभून दिसेल असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in