रितेश-जेनेलियाच्या मुलांनी केलं अनोख्या पद्धतीने नववर्षाचं स्वागत

रिहान-राहील आजीसोबत कॅरम खेळण्यात मग्न, नववर्षाचं कूटुंबीयांसोबत स्वागत
रितेश-जेनेलियाच्या मुलांनी केलं अनोख्या पद्धतीने नववर्षाचं स्वागत
PM

सगळीकडे नववर्षाचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. मनोरंजन क्षेत्रातील महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे रितेश-जेनेलियानेही नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं. रितेश आणि जेनेलियाने कुठल्याही हॅाटेल किंवा रेस्टाॅरंटमध्ये न जाता, नववर्षाचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं आहे. रितेश आणि जेनेलिया नववर्षाच्या स्वागतासाठी लातूरला गेले आहेत, त्यांनी आपल्या देशमुख वाड्यावर कुटूंबासह नववर्षाचं सेलिब्रेशन केलं आहे. जेनेलियाने या सेलिब्रेशनचे काही फोटो- व्हिडीओ इस्टांग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये रिहान आणि राहील हे आपल्या आजीसोबत कॅरम खेळताना दिसत आहेत. जेनेलियाने या फोटोंना कॅप्शन देत लिहिते, “आजी-आजोबांबरोबर कॅरम… आपल्या गावी म्हणजे लातूरच्या बाभळगावी कुटुंबीयांबरोबर एकत्र नवीन वर्ष सेलिब्रेट करण्याचा आनंद काही वेगळाच आहे.” याशिवाय रितेशने देखील “मिस्टर अँड मिसेस देशमुखांकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा” अशी खास पोस्ट शेअर केली आहे.

PM

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in