प्रेमाची नवी सुरुवात...

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित
प्रेमाची नवी सुरुवात...

आलिया भट आणि रणवीर सिंग यांची जोडी 'गल्लीबॉय' नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येत आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं. दोघंही लाल रंगाच्या पोशाखात शोभून दिसत आहेत.

तब्बल सात वर्षानंतर करण जोहर दिग्दर्शन करणार आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर करत ''प्रेमाची सुरुवात झाली आहे '' असं करण जोहरने सोशल मीडियावर लिहिलं आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचा टीझर २० जूनला प्रदर्शित होणार आहे. हा बिग बजेट चित्रपट येत्या 28 जुलैला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट सोबत इतर दिग्गज कलाकारदेखील दिसतील. धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी सुद्धा यात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in