रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण!

सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नववर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत.
दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि  रोहन मापुस्कर
दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि रोहन मापुस्करएक्स @mapuskar_rajesh
Published on

मुंबई : सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नववर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव रोहन मापुस्कर हे दोघे एक नवीन प्रकल्प घेऊन येत आहेत.

राजेश मापुस्कर यांना ‘व्हेंटिलेटर’, ‘फरारी की सवारी’, आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘येक नंबर’ सारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखलं जातं, तर रोहन मापुस्कर यांनी प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’ व ‘३ इडियट्स’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मापुस्कर ब्रदर्स ‘एप्रिल मे ९९’ हा आगामी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन मापुस्कर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

तर आता प्रश्न असा आहे की, चित्रपटाची कथा काय असेल? कलाकार कोण असतील? यांसारख्या अनेक गोष्टी अद्याप गोपनीय असल्या तरी या नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स एकत्र येऊन मोठ्या पडद्यावर धमाका करणार हे नक्की!

logo
marathi.freepressjournal.in