‘आता वेळ झाली’ असं का म्हणत आहेत हे कलाकार ?

दिलीप प्रभावळकर- रोहिणी हट्टंगडी का आलेत एकत्र?
‘आता वेळ झाली’ असं का म्हणत आहेत हे कलाकार ?

ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात अस्तित्त्ववादाची कोडी गहन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्याचा अंत सुखमय व्हावा, असे वाटू लागते. ‘आता वेळ झाली’ या मराठी चित्रपटाची कथा अशाच एका खऱ्या घटनेवर आधारित असून हा चित्रपट यंदाच्या हिवाळ्यात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सध्याच्या स्थितीत मानवी मुल्ये जपणाऱ्या कोणाच्याही मनात द्विधा परिस्थिती निर्माण करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाने केले असून सोबतीला भक्कम अशी कलाकारांची फळी आहे.

दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांची जोडी चित्रपटात एकत्र दिसणार आहे.हा चित्रपट खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखांवर आणि त्यांच्या अनुभवावर बेतलेला आहे. चित्रपटाची कथा खिळवून ठेवणारी, काहीशी गमतीदार आणि तरीही भावनात्मक आहे.

''तसे पहिले तर हृषीकेश मुखर्जी यांच्या सदाबहार ‘आनंद’ची ही दुसरी बाजू आहे. इथे मृत्यूला हसून सामोरे जाण्याची गोष्ट नाही तर आयुष्याच्या अंतामध्ये संपूर्णपणे हसत राहण्याची गोष्ट आहे. कोविड साथरोगाच्या काळात सक्रीय इच्छामरण हा विषय माझ्या मनात रुंजी घालत होता. त्यावेळी संपूर्ण जग आयुष्य आणि मृत्यू यांकडे संपूर्णतः वेगळ्या नजरेने पाहत होते. अगदी युवकही आयुष्याकडे भौतिकवादी दृष्टीने पाहण्याऐवजी व्यावहारिक दृष्टीने पाहू लागले होते. जगभरातील चित्रपट महोत्सावांमधील प्रेक्षक हा चित्रपट पाहिल्यावर याच मताचे बनले. चित्रपट पाहिल्यावर ते निस्तब्ध झाले होते आणि वयस्क लोक तर साश्रू नयनांनी व्यक्त होत होते. युवा प्रेक्षकांनी आयुष्यातील ही बाब अगदी गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे मान्य केले,” असे उद्गार अनंत नारायण महादेवन यांनी काढले. या चित्रपटात ते लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अशा तिहेरी भूमिकेत आहेत.

‘आता वेळ झाली’ हा आत्तापर्यंत कित्येक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवडला गेला आहे. डल्लास इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, राजस्थान इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल आणि जागरण फिल्म फेस्टिव्हल यांचा त्यात समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in