Oscars 2023 : आता ऑस्करमध्ये वाजणार 'नाटू नाटू'; अकादमीने ट्विटकरून दिली माहिती

'आरआरआर'मधील सुप्रसिद्ध 'नाटू नाटू' हे गाणे आता ऑस्करच्या (Oscars 2023) सोहळ्यात वाजणार असून अधिकृत महिती दिली
Oscars 2023 : आता ऑस्करमध्ये वाजणार 'नाटू नाटू'; अकादमीने ट्विटकरून दिली माहिती

येत्या १३ मार्चला बहुचर्चित ऑस्कर पुरस्कार (Oscars 2023) विजेत्यांची घोषणा होणार आहे. भारतीयांसाठी हा सोहळा खास असणार आहे. कारण, 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्करच्या 'सर्वोत्कृष्ट गाणे' विभागात नामांकन मिळाले आहे. याहून आनंदाची बातमी म्हणजे हे गाणे या सोहळ्यामध्ये सादर केले जाणार आहे. त्यामुळे भारतीयांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अकादमीने ट्विट केले आहे की, "ऑस्कर सोहळ्यात 'नाटू नाटू' गाण्याचे लाइव्ह सादरीकरण केले जाणार आहे. या गाण्याचे गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव हे गाणे सादर करणार आहेत," ऑस्करच्या इतिहास पहिल्यांदाच असे कोणतेतरी भारतीय गाणे सादर केले जाणार आहे. त्यामुळे हा भारतीयांसाठी एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. तसेच, या गाण्याला ऑस्करने नावाजले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीतकार एम एम कीरवानी यांनी या सोहळ्यासाठी लाइव्ह सादरीकरणाची तयारी सुरू केली आहे. मात्र, आणखी एक उत्सुकता वाढवणारी बातमे म्हणजे दाक्षिणात्य अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण हेदेखील या गाण्यावर थिरकताना दिसण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. असे असले तरीही, यंदाचा हा ऑस्कर सोहळा भारतीयांसाठी ऐतिहासिक ठरणार हे निश्चित.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in