सचिन तेंडुलकरसुद्धा म्हणाला, ''बाईपण भारी देवा''

मास्टरब्लास्टरलासुद्धा पडली चित्रपटाची भुरळ
सचिन तेंडुलकरसुद्धा म्हणाला, ''बाईपण भारी देवा''

सध्या महाराष्ट्रात ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ केला आहे . कित्येक वर्षांनी एखाद्या चित्रपटासाठी नटून थटून,नऊवारी साडी आणि नाथ घालून, अनेक मैलाचा प्रवास करून, वेगवेगळ्या वयोगटातील महिलावर्ग चित्रपट बघायला येत असल्याचं दिसतंय.

पण आता यात पुरुषही काही मागे राहिले नाहीयेत. तेवढ्याच उत्साहाने पुरुषदेखील कुटुंबासमवेत सिनेमागृहांमधे हा चित्रपट बघताना दिसून येत आहेत.

चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटून गेलाय तरीही बाईपण भारी देवाचं वादळ महाराष्ट्रभर ठाम धरून आहे. आणि आता ते आता थेट मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत पोहचलं आहे. नुकताच त्यांनी हा चित्रपट आपली पत्नी अंजली तेंडुलकर आणि मित्र परिवारासह पाहिला. आता त्यांनी आपल्या आईला ही फिल्म दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सचिन तेंडुलकर यांनी सोशल मिडिया वरदेखील बाईपण भारी देवा या चित्रपटाचं कौतुक केलं आहे,त्यांनी लिहिलंय "बाईपण भारी देवा ही 6 बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. मला हा मराठी चित्रपट पाहून खूप आनंद झाला आणि कधी एकदा माझी आई आणि आत्या हा चित्रपट बघतायत याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. तसेच चित्रपटाच्या कलाकारांना भेटणे हा एक सुंदर अनुभव होता!’

logo
marathi.freepressjournal.in