साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; भारत सासणे, देविदास सौदागर मानकरी

साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा साहित्य अकादमीचा २०२४चा पुरस्कार ख्यातनाम साहित्यिक आणि कादंबरीकार भारत सासणे यांना बालसाहित्यासाठी आणि देविदास सौदागर यांना युवा साहित्यासाठी जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; भारत सासणे, देविदास सौदागर मानकरी
Published on

नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा साहित्य अकादमीचा २०२४चा पुरस्कार ख्यातनाम साहित्यिक आणि कादंबरीकार भारत सासणे यांना बालसाहित्यासाठी आणि देविदास सौदागर यांना युवा साहित्यासाठी जाहीर झाला आहे.

मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांतील पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. साहित्य अकादमीने आपल्या प्रतिष्ठेच्या तरुण व बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. २४ भाषांमध्ये दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांबाबत साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी माहिती दिली. संस्कृत वगळता सर्व भारतीय भाषांचे पुरस्कार जाहीर केले.

यात भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ तसेच देविदास सौदागर यांच्या ‘उसवण’ कादंबरीची निवड करण्यात आली आहे. ‘उसवण’साठी देविदास सौदागर यांना मराठी भाषेतील ‘युवा साहित्य’ पुरस्कार आणि भारत सासणे यांना ‘बाल साहित्य’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ५० हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच यावेळी कवितासंग्रह, बालसाहित्य, कादंबरी यांसारख्या अनेक साहित्यांचा आणि साहित्यिकांचा समावेश करण्यात आला आहे.

आसामी भाषेसाठी ‘जाल कोट जुई’ या कथासंग्रहासाठी नयनज्योती शर्मा, बंगाली भाषेसाठी सुतपा चक्रवर्ती यांचा कथासंग्रह ‘देराजे हालुद फुल’, बोडो भाषेसाठी ‘साइख्लुम’, डोगरी भाषेसाठी हीना चौधरी यांचा काव्यसंग्रह ‘इक रंग तेरे रंगें चा’, इंग्लिश भाषेसाठी ‘के. वैशाली यांचे ‘होमलेस ग्रोइंग अप लेस्बियन ॲॅण्ड डिस्लेक्सिक इन इंडिया’ या पुस्तकासाठी, गुजराती भाषेसाठी रिंकू राठोड यांचा काव्यसंग्रह ‘…तो तमे राजी को’,

हिंदी भाषेसाठी गौरव पांडेय यांचा काव्यसंग्रह ‘स्मृतियों के बीच घिरी है पृथ्वी को’, नेपाळी भाषेसासाठी सूरज चापागाई यांचा काव्यसंग्रह ‘क्यानभोसको क्षितिज को’, पंजाबी भाषेसाठी रणधीर के यांचा काव्यसंग्रह ‘खत जो लिखणों रह गए’, राजस्थानी भाषेसाठी सोनाली सुधार यांचा काव्यसंग्रह ‘सुध सोधूं जग’ आणि उर्दू भाषेसाठी जावेद अंबर मिस्बाही यांचा काव्यसंग्रह ‘स्टेपनी’ यांना पुरस्कार मिळाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in