नव्या घराचा व्हिडिओ शेअर करत सई झाली भावूक ; चाहते कमेंट करत म्हणाले...

सई ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या चाहत्याचं नेहमीच मनोरंजन करत असते.
नव्या घराचा व्हिडिओ शेअर करत सई झाली भावूक ; चाहते कमेंट करत म्हणाले...

मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रासिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने मराठी मनोरंजनसृष्टी बरोबरच बॉलिवूडमध्येही धमाकेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. सई ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या चाहत्याचं नेहमीच मनोरंजन करत असते.

अश्यातच सईने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यात तिने तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. सई तिच्या स्वत:च्या हक्काच्या घरात रहायला गेली आहे. मात्र तिला यावेळी जितका आनंद नवीन घरात येण्याचा आहे तितकच तिला जूनं घरसोडण्यामुळे वाईट वाटत आहे..

या व्हिडिओत ती म्हणतेय की, "तिला या घरातून जायचं नाही, तिला माहिती आहे ते घर मोठ मस्त आहे. पण काही गोष्टी सुटत नाहीत, तसचं काहीस या घराबद्दल आहे. या घराने तिला खुप काही दिलयं ती ते नाही सोडू शकत". व्हिडिओत तिच्या पुर्वीच्या घरातून सामान शिफ्ट करताना दिसत आहे.

सईनं हा व्हिडिओ शेयर करताच अनेक मराठी कलाकारांनी तिला नव्या घरासाठी शुभेच्या दिल्या असून तिचं अभिनंदन देखिल केलं आहे. अनेक चाहत्यांनीही तिच्यावर गर्व असल्याचं सांगत तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in